Friday, October 30, 2009

कोहम् ?

27 ऑक्टोबर 2009 रोजी, मुंबईला, ‘Identity, Market and Social Welfare’, ‘ओळख, बाजारपेठ आणि सामाजिक कल्याण’ या शीर्षकाचे त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली आणि आपल्या सर्वांना ओळख (Identity) देण्याचा घाट घातलेल्या UIAI आणि नंदन निलेकणी यांच्या मनात नेमके काय आहे हे थोडे थोडे समजले.


ओळख: नंदन निलेकणींची
इंफोसिस या कंपनीची स्थापना केलेल्या सहा उद्योजकांपैकी नंदन निलेकणी हे एक. पंतप्रधान मनमोहन सिंघ यांनी निलेकणी यांच्यावर भारतीय विशिष्ट पहचान प्राधिकरण (Unique Identification Authority of India, UIAI)  याची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार जुलै 2009 मध्ये इंफोसिस मधून राजिनामा देऊन ते UIAI चे अध्यक्ष म्हणून रुजू झाले. ही त्यांची सर्वात नवीन ओळख. ‘Imagining India: The idea of a Renewed Nation’ या पुस्तकाद्वारे भारताबद्दलचे त्यांचे स्वप्न त्यांनी मांडले आहे. हे स्वप्न साकरण्यासाठी UIAI चे कार्य महत्त्वाचे ठरेल.


 प्रयोजन: सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांची सद्य स्थिती
•    सध्या सामाजिक कल्याणासाठी अनेक योजना सध्या राबविल्या जात आहेत. त्यांवर भरपूर पैसा खर्च देखील होत आहे. जसे की रोजगार हमी साठी 2009-2010 साठी 40 हजार कोटी रुपयांची तरतूत केली गेली आहे. अनेक अशा योजना आहेत ज्याचा लाभ विशिष्ट घटकांना मिळतो. जसे की जननी सुरक्षा योजना ही मातांसाठी आहे, इंदिरा आवास योजनेत ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते इत्यादी. या सर्व योजनांचा लाभ हा गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणे हे फार मोठे आव्हान आहे. 25 वर्षांपूर्वी राजीव गांधी यांनी जाहीर केले होते की सामान्य माणसाठी तरतूत झालेल्या रुपयापैकी केवळ 16 पैसेच त्याच्यापर्यंत पोहोचतात. या परीस्थितीत आजतागयत फार काही बदल झालेला नाही असे माँटेक सिंघ आहलुवालियांनी नुकतेच म्हटले आहे.

•    सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांचा आणि बाजारपेठेचा फार संबंध नाही. ही दोन वेगळी बेटे आहेत. सरकारने केलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ सरकारी यंत्रणेच्या मार्फतच लोकांपर्यंत पोहोचतो. जसे की कमी दरात धान्य पुरवठा म्हणजे रेशन साठी सरकारनी एक अवाढव्य यंत्रणा उभारलेली आहे. गोडाऊन पासून ते दळवळणापर्यंत सर्वच जबाबदारी सरकारी आहे व त्यामुळे अकार्यक्षमता येतेच, त्याचबरोबर गळतीही होते. मुक्त बाजारपेठेचा व खाजकी व्यवसायातील उद्योजकते मुळे येणा-या कार्यक्षमतेचा मिलाफ सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांशी कसा जोडता येईल हे एक आव्हान आहे.

•    विविध प्रकारची ओळखपत्रे सध्या उपलब्ध आहेत. रेशन कार्ड, पासपोर्ट, इलेक्शन कार्ड, जॉब कार्ड इ. यात अनेक तृटी आहेत. खोटी, एकाच माणसाकडे एकापेक्षा जास्त, अस्तित्त्वात नसलेल्या मांणसांच्या नावावर असे अनेक गैर व्यवहार इथे चालतात. काही गावे अशी आहेत की जिथे लोकसंखेपेक्षा अधिक रेशन कार्डे आहेत आणि त्याच वेळेला गरजूंकडेच रेशन कार्ड नाही. त्यामुळे अनेक गैर व्यवहार तर चालतातच पण खरोखर गरजू असलेल्या माणसाला लाभ मिळतंच नाही.
या तिन्ही बाबी काही नवीन नाहीत. गेली अनेक वर्षे आपण यांच्याशी झगडत आहोत. सुदैवाने गेल्या काही वर्षात दोन व्यवस्थांमध्ये अमूलाग्र बदल झाले आहेत ज्याच्यामुळे आपल्याला या 60 वर्ष आपल्याला सतावणा-या प्रश्नांना सोडवणे शक्य झाले आहे असे वाटते आहे.

दोन क्रांत्या: मोबाईल फोन व इंटरनेट बँकिंग

मोबाईल: 10 ते 15 वर्षांपूर्वीचीच म्हणजे अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणता येईल अशी. मोबाईल च्या इनकमिंग साठी देखील आपण 17 रु प्रति मिनिट देत होतो. 1999 साली अंदाजे 25 लाख मोबाईल ग्राहक होते, तेच 2009 साली अंदाजे 30 कोटी आहेत. यापैकी बहुतांशी प्रीपेड सुविधा वापरतात आणि त्यापैकीही बहुतांशी ही 10 रु चे रीचार्ज टाकतात. 15 वर्षांच्या काळात झपाट्याने हे बदल घडले आहेत.

इंटरनेट बँकिंग़: नव्वदच्या दशकात बँकांमध्ये हळू हळू संगणक रुजविण्यासाठी प्रयत्न चालू झाले आणि त्यावेळी या संगणक याचा उल्लेख न करता रंगराजन (ज्यांनी यासाठी प्रयत्न केले) याला अकाउंट्स लेजर असे म्हटले होते. संगणकाचा कामगार संघटनांकडून विरोध होईल या भितीने. पुढे काही वर्षांनी त्यानी याचे वर्णन ऍडवांस्ड अकाउंट्स लेजर असे केले. म्हणजे संगणकाची बँकेच्या संदर्भात त्या दिवसात ‘He who must not be named’ अशी ओळख होती . तेच आता आपण सर्वत्र एटीएम, इबँकिंग, ऑनलाइन ट्रान्स्फर असे सर्रास वापरतो. परंतू अजूनही ग्रामीण भागात आणि गरजूंपर्यंत या क्रांतीचे फायदे पोहोचले नाहीयेत.

युनीक आयडेंटिटी: एकमेव ओळख, विशिष्ट ओळख  वरील दोन क्रांतीकारक बदलांची सांगड सामाजिक कल्याणकारी उपक्रमांशी घालण्यासाठी बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा उपयोग UIAI करणार आहे. जसे की दहा बोटांचे ठसे डोळ्यामधील आयरीस ची खूण. नेमकी कोणती पद्धत वापरली जाईल हे अजून निश्चित झालेले नाही. अशा प्रकारे प्रत्येक व्यक्तीला एकमेव पद्धतीने ओळखले, की या ओळखीची सांगड इतर गोष्टींशी नेमक्या पद्धतीने लावणे शक्य होईल. जसे की र्बँकेतील इ-खाते. योजनेत आर्थिक व्यवखार असेल तर तो थेट व्यक्तीच्या खात्यात विनाविलंब पोहोचवता येईल. जेव्हा जेव्हा सरकारी योजनांचा लाभ व्यक्तीला मिळेल तेव्हा त्याची नोंद ठेवली जाईल. यामुळे अनेक गैरव्यवहारांना आळा बसेल.

समाजिक कल्याण व बाजारपेठेशी जोड
याचा मला जो अर्थ लागला तो Public Distribution System (PDS) च्या संदर्भात असा की सध्या अन्न धान्य गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम आहे. कोणते अन्न, त्याचा दर्जा, त्याची उपलब्धी याच्या निवड गरजू करू शकत नाही. मधली यंत्रणा (दुकानदार, कंत्राटदार) आपल्या सोयीनुसार, इच्छेनुसार जे आणि जेव्हा उपलब्ध करून देईल ते नाइलाजाने घ्यावे लागते. तेच जर सरकारने थेट पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले आणि या पैशांचा अन्नासाठीच उपयोग केला जाईल अशी सुविधा केली (संगणकाद्वारे असा प्रोग्रॅम लिहिणे शक्य आहे) की मग ती व्यक्ती अन्न कुठून, केव्हा घ्यायचे याचा निर्णय स्वयं घेऊ शकेल. मुक्त बाजारव्यवस्थेतून निवड करून ती हा निर्णय घेईल आणि बाजारपेठेशी जोडली जाईल. अर्थात याचे फायदे जसे आहेत तसेच धोकेही आहेत. खाजकीकरणातून सेवेचा दर्जा वाढतोच असे नाही. या बद्दल सतत सतर्क रहावे मात्र लागेल. पण नेमके म्हणजे काय याचा माझा अभ्यास नाही.
देशातील सुरक्षेशी याचा जवळचा संबंध आहे. पण या संदर्भात निलेकणी बोलले नाही. स्वातंत्र्य अबाधित राखून सुरक्षा साधणे हे या बदलासमोरचे मोठो आव्हान राहणार आहे.

सारांश
या प्रकल्पामुळे अनेक फायदे दिसत असले तरी यातून निर्माण होणारे धोके असणारच ज्याचे सध्या भाकित करणे आपल्याला जमणार नाही. पेट्रोल च्या जोरावर आपण प्रचंड प्रगती केली तरी त्याचा आता ग्लोबल वॉर्मिंग शी संबंध आपल्याला आता समजलाय तसे. या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे या तंत्रज्ञानातील क्रांतीचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. याचे महत्त्वाचे कारण हे राजकीय इच्छाशक्ती. वरून जरी इच्छा असली तरी मधल्या अनेक घटकांच्या विरोधाला सामना द्यावा लागणार आहेत.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपल्यातील भ्रष्ट वृती, हाव ही काही बदलणार नाही. यांशी आपला लढा व्यक्तीगत आणि सामाजिक पातळीवर चालूच राहील.

-प्रियदर्शन

Monday, October 12, 2009

लोकशाही च्या प्रयोगातील निर्णायक वळण: एका अज्ञानी युवकाच्या दृष्टीतून

ADR (Association for Democratic Reforms) व NEW (National Election Watch) यांनी केलेले काम हे  लोकशाही बळकट करण्यासाठीचा फार महत्त्वाचा टप्पा वाटतो. महाराष्ट्रात 13 ऑक्टोबर 2009 रोजी निवडणूक होणार आहे. NEW नी 169 उमेदवार, जे 2004 साली उभे होते व आता 2009 मध्ये परत उभे रहाणार आहेत अशा उमेदवारांची माहिती संकलित केलेली. याची PDF आपल्याला इथे मिळेल.
या 169 उमेदवारांच्या माहितीचा थोडा अर्थ लावण्याचा प्रयत्न

सरासरी मालमत्ता
 • 2004 साली 1.3 कोटी होती 
 • 2009 साली 3.8 कोटी आहे 
 • म्हणजेच सरासरी 2.5 कोटी ची वाढ 
एकूण मालमत्ता 
169 उमेदवारांची मिळून एकूण मालमत्ता 
 • 2004 साली 229 कोटी 
 • 2009 साली 657 कोटी 
 • म्हणजेच 428 कोटी ची वाढ
पक्ष निहाय उमेदवारांची मालमत्ता
 • काँग्रेस    39 उमेदवार:    एकूण 291 कोटी:   सरासरी 5.8 कोटी
 • राष्ट्रवादी  39 उमेदवार:    एकूण 139 कोटी:   सरासरी 3.5 कोटी
 • शिवसेना 33 उमेदवार:    एकूण 131 कोटी:   सरासरी 3.8 कोटी
 • बीजेपी     23 उमेदवार:   एकूण 48   कोटी:   सरासरी 2 कोटी
Top 10 अमीर उमेदवार

तक्त्यावर क्लिक करा!!

विचार, विश्लेषण 
आपले राजकीय पुढारी हे पैसेवाले आहेत हे तर यावरून सिद्ध होते. पण पैसे असणे हा काही गुन्हा नाही. हे पैसे नेमके कसे मिळवले जातात हे समजले पाहिजे. ते कसे समजेल?

एका थियरी नुसार बदल घडण्यासाठी च्या चार पायर्‍या असतात. विवेक सावंतांकडून मी या शिकलो. त्या चार पायर्‍या आहेत
 • Information: परीस्थिती काय आहे, नेमका प्रश्न काय आहे या बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे ही पहिली पायरी. जसे की ग्लोबल वॉर्मिंग बद्दल 'Inconvenient Truth' या चित्रपटाद्वारे शास्त्रशुद्ध माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचली. अनेक नेते पैसे खातात हे जरी सर्वज्ञात असले तरी याची नेमकी अकडेवारी आता आपल्या समोर आहे. चला तेवढे नीट समजले.
 • Interaction: एकदा महिती पोहोचली की लोक त्यावर विचार करतात, चर्चा करतात वाद घालतात... या बद्दल काही करता येईल का याबद्दलचे मार्ग शोधायचा प्रयत्न करतात. आजकाल ब्लॉग्स लिहितात :) ही झाली दुसरी पायरी. 
 • Transaction:  त्यापैकी काही लोक या बद्दल कृती करायला लागतात. वैयक्तिक, एकत्र येवून, अनेको प्रकारच्या ज्याला जमेल तशा.
 • Transformation: या तिन्ही पातळ्यांवर अनेको लोक आपापल्या परीने योगदान देत असता... कधीतरी अशी एक अवस्था निर्माण होते की बधल घडून येतो. 
राजकारणी आणि नोकरशाहीतील भ्रष्टाचारी वृती यावर नियंत्रण आणण्याच्या लढ्यात माझ्या मते आपण पहिल्या पायरीवर आहोत. व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे इंटरनेट, मोबाईल या माध्यमातून शक्य झाले आहे. यांचा उत्तमोत्तम वापर करून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे चालूच ठेवावे लागेल. इंटरनेट सध्या काही मर्यादित वर्गापर्यंत पोहोचले आहे. पण हा वर्ग म्हणजे माझ्या तुमच्या सारख्यांचा वर्ग. जो राजकीय बाबतीत सर्वात कमी जागृत असायचा. त्यामुळे आता राजकीय वास्तव एक वेगळेच वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दुसर्‍या आणि तिसर्‍या पायर्‍यांवर आपण कसे काम करायचे हे आता आपल्या समोरील आव्हान राहील.

भारतातील अवाढव्या अशा लोकशाही च्या LIVE प्रयोगात काय काय घडते त्याबद्दल उत्सुक!!

-प्रियदर्शन

Book Review - Small is Beautiful

Small is beautiful
-By E.F. Schumacher

Written during the 1973 energy crisis, it was a very influential book which is divided into four parts of 'The modern world', 'Resources', 'The Third World' and 'Organization and ownership'. The ideas discussed and lessons learned are also very much relevant even today.

Frankly I was not able to clearly interpret everything that I read but sometimes that fact itself makes a book much more interesting.

To start with I was told that the book is on economics but it covers a lot many things and yes all that is done from the point of view of economics. Many a times I felt like the things what I am
reading are no way near to economics(It is off course my inability to connect) but it is fun to read anyways.

At first you start reading and you feel like it is a collection of authors thoughts on various issues which are vaguely organized and the chapters flow in a direction that don't seem to make sense but soon as you get the big picture you realize that the agruments made were very much affable to the given conclusion. The thing that I liked especially is the abundant reference text from other books and wise wording of various great persons are included at
regular interval.

Since I found it a bit hard to read, I might as well include my
way to do it :)
The best way to read (According to me),
1) Start the book with aim that you will read at least two chapters
(Because if you don't do so, there is very high probability that you
will not understand a para, loose interest and keep the book aside)
2) Stop in between and think about what you read. (Only then you
realize the beauty of the ideas conveyed)
3) Finally keep the book aside and you will feel happy that you read
significant part. (Don't read lot because I felt like the material is
bit heavy to digest)

To describe the things in short, man in his excitement to utilize and develop his scientific and technical powers has built a system that ravishes nature. His ever-increasing infinite needs cannot be satisfied by finite resources. The importance to consider the human factor while measuring various economic parameters, importance of land as a resource, ownerships in
large scale organizations and many such interesting topics are discussed.
So people who like to put their thinking cap on and are interested in
studying various systems should surely read this one.

Note :- You need not know any economics to enjoy the book. :)

-Anwar Sahib

Friday, October 9, 2009

ADR, NEW and The Business Model of Politics

For a Marathi Version of this article click here!
Inspired from P.Sainath's article. Read it here!
Starting a new business, we think about profit and growth. Entrepreneurs across the world are innovating different business models to solve the complex challenges that our world is facing. P. Sainath's article and the efforts of NEW (National Election Watch)   have brought forth this revolutionary new business model. (Not that it was completely unknown, but now we have numbers to back our intuition)
ADR and NEW
Got introduced to some innovative social initiatives. ADR (Association of Democratic Reform) filed a PIL in response to which the Supreme Court resolved that candidates standing for elections have to declare their assets, education and criminal record. To know the historical journey of this PIL visit here! NEW is a collective effort by 1200 organizations who are organizing this information for public viewing.
Some facts and numbers
In Hariyana 42 MLA's who are re contesting have astonishing information to share.
 • Average wealth has grown by 4.8 crore Rs
 • i.e. average rise of 388%
 • i.e. average rise of  8 lakh Rs/month
 • i.e about 1,100 Rs/day
 • The top four MLAs (considering growth rate) have a growth of 800%
 • The topper amongst them has an astonishing growth of 5000% which means from an initial of 1 lakh Rs it is now 50 lakh Rs
Learning from these numbers P. Sainath suggests that every citizen should become an MLA atleast once. It would be the most promising poverty alleviation program. Even if we consider the recently increased minimum wage of NREGA of Rs 100, a worker turned MLA would earn in a months time what he/she aould have earned in 8000 days (20 years).
myneta.info An Information Revolution
To access information of a candidate from your constituency, visit myneta.info Info on most candidates is available. See and be aware... as I did :) 
Challenges ahead
The work done by ADR is very inspiring. They have not stopped at filing the PIL. Through NEW they are also documenting the information in a relevant format. Two very important milestones in strengthening the democracy of our country. This power of information has greatly empowered us. So where do we go from here?  Currently I'm spreading this information to as many people as I can. 
I still have some questions
 • What happens of the MLA whos wealth grows from 1 lakh to 50 lakh?
 • What is the mystery behind this?
 • How does Govinda work in films even when he is elected representative?
 • What can I do?
Looking forward to ideas, suggestions, questions... 


Optimistic Inspite,
-Priyadarshan

ADR, NEW व राजकारणाचे बिसनेस मॉडेल

पी साईनाथ यांच्या लेखावरून प्रेरीत . इथे वाचू शकतो.
नवीन उद्योग सुरू करताना आपण अर्थातच नफ्याचा विचार करतो. जगातील जटिल प्रश्न सोडवण्यासाठी अनेक उद्योजक नवनवीन प्रयोग करून वेगवेगळी बिसनेस मॉडेल्स विकसित करत आहेत. पी साईनाथ यांच्या लेखामुळे व NEW, (National Election Watch) या नवीन चळवळीच्या कामातून हे अफलातून, अविश्वसनीय वाटावे असे बिसनेस मॉडेल समोर आले आहे. (हे माहित नव्हते असे नाही पण नेमकी आकडेवारी मिळाल्यामुळे हे नीटच समजले आहे)
ADR व NEW
या निमित्तानी नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम समजले. ADR (Association of Democratic Reforms)  यांनी केलेल्या PIL मुळे 2002 साली उच्च न्यायालयानी असा निर्णय दिला की निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराने आपले शिक्षण, मलमत्ता व criminal record जाहीर केले पाहिजे. या PIL च्या प्रकियेचा इतिहास इथे वाचा. NEW ही 1200 चे संघटन आहे व ते उमेदवारांनी जाहिर केलेली माहिती संकलित करून लोकांसमोर मांडतात.
काही आकडेवारी: एक यशस्वी बिसनेस मॉडेल
हरियाणा मध्ये 42 MLA जे पुन्हा उभे आहेत त्यांबद्दल काही माहिती
 • सरासरी त्यांची मलमत्ता 4.8 कोटी रुपयांनी वाढली आहे
 • सरासरी 388% मालमत्तेत वाढ
 • म्हणजेच प्रत्येकाची सरासरी दर महा वाढ 8 लाख रुपये 
 • म्हणजेच अंदाजे 1,100 रु
 • प्रति तास 
 • वाढीचा सर्वोत्कृष्ट दर असलेले पहिले 4 MLA यांच्या मालमत्तेत 800% वाढ आहे 
 • यातील अग्रक्रमांकावर असलेला MLA ज्याची मालमत्ता 1 लाख होती त्यात 5000% वाढ असून ती आता 50 लाख रुपये झालेली आहे
हा वाढीचा दर लक्षात घेता साईनाथ म्हणतात की प्रत्येक भारतीय नागरीकाने किमान एकदा तरी MLA बनावे! गरिबी हटवण्यासाठी चे हे सर्वोत्तम बिसनेस मॉडेल राहील. NREGA चे वाढीव 100 रु किमान वेतन जरी धरले, तरी 8000 दिवस (20 वर्षे) राबून झालेली कमाई महिन्यात होऊन जाईल.


myneta.info माहितीची क्रांती
आपल्या मतदार संघातील उमेदवाराची माहिती हवी असल्यास myneta.info वर मिळेल. बहुतांशी उमेदवारांची माहिती इथे उपलब्ध आहे. बघा... व जागृत व्हा... मी झालो तसा :)
पुढील आव्हाने
ADR नी केलेल्या कामातून प्रचंड फारच प्रेरणा मिळाली. केवळ PIL करून ते थांबले नाहीत. NEW या उपक्रमातून त्यांनी या माहितीचे उचित स्वरूपात संकलन करण्याची जबाबदारीही हाती घेतली आहे. लोकशाही ला बळकट करण्यासाठी ही दोनही केवढी महत्त्वाची कार्य!  प्रत्येक सामान्य माणसापर्यंत ही केवढी मोठी माहितीची ताकत या कार्यामुळे आली आहे.  आता पुढे काय? सध्यातरी मी माझ्या मित्रपरीवारामध्य या महितीचा प्रचार करतो आहे.
आजून काही बाळबोध प्रश्न पडतात.
 • 1 लाख रुपयापासून 50 लाख रुपयापर्यंत जाणार्‍या माणासाचे काय होते? 
 •  नेमके या मागचे गूढ काय असते? 
 • गोविंदा निवडून आल्यावरही चित्रपटात कामे कसे काय करतो? 
 • मी काय करू शकतो?
तुम्हालाही काही सुचत असेल, प्रश्न असतील तर शेअर करा ...

तरीही प्रचंड आशावादी मनस्थितीत...
-प्रियदर्शन