Wednesday, December 23, 2009

यमगरवाडी बद्दल थोडंसं!!

खरं तर सुरुवात कशी करावी ते कळत नाहीये आणि हा माझा लेख लिहिण्याकचा तसा दुसराच प्रसंग आहे....

भटके विमुक्तं विकास प्रतिष्ठातन (BVVP) गेल्या 14 वर्षांपासून विविध समाज प्रश्नां वर काम करते आहे. प्रतिष्ठारनच्याव विविध प्रकल्पांवपैकी यमगरवाडी प्रकल्पव (केशवनगर विद्या संकुल) हा महाराष्ट्राशत उस्मानाबाद जिल्ह्यात, तुलजापूरजवळ नांदुरी येथे राबवण्यात येतोय. हा प्रकल्पं 1993 मध्येण 18 एकर जागेवर श्री रमेश छटुफले यांनी दिलेल्या जमिनीवर 25 भटक्या  मुलांना घेऊन सुरु झाला. आज गिरीश प्रभुणे या कल्पाक आणि खंद्या कार्यकर्त्यामुळे यमगरवाडीला निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत 400 मुले आणि 200 मुली शिकत आहेत. या शाळेत मुख्यित्वेम पारधी समाजातील मुले आहेत. या उपेक्षित समाजातील पालकांमध्येआ जागृतीचं काम करणं, त्यांहच्यात मुलांना एकत्र करुन शिक्षण देणं हे एक आव्हातनात्मचक कार्य आहे, जे गिरीश प्रभुणें करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच मी अहमदनगरला एका शिबिरात गेलो होतो आणि तिथं मला गिरीश प्रभुणे यांच्या  कार्याबद्दल माहिती मिळाली. त्यांाचं कार्य समजून बघणं, समजून घेणं आपल्याचला जमेल त्याक वेळात करायचं असं मी ठरवलं होतं.

आणि नेमकं 15 तारखेला माझा मित्र राजन याचा मला फोन आला की, “यमगरवाडी हा एक अनाथ मुलांकरता (पारधी समाजातील) प्रकल्पत चालतो. तेथील काही मुलांना दरवर्षी दिवाळीकरता पुण्यापत वेगवेगळ्या इच्छुरक लोकांकडे (2-2 किंवा 1-1 मुलांना) रहायला पाठवलं जातं. तर तू तुझ्याकडे एका मुलाला घेऊन जाशील का?” असा मित्राचा प्रश्नय ऐकताच मनात होकार देण्यााची खूप इच्छा् असूनही मी “नाही” म्हीटलं कारण मला त्यामच काळात वाईला जाणं आवश्य क होतं. त्यायवर तो म्हलणाला, “हरकत नाही मात्र ज्या‍वेळी या मुलांची सहल निघणार आहे त्याहवेळी या मुलांसोबत त्यांणच्याहकडे बघायला म्हजणून नक्कीस ये”. मी “हो” म्हेटलं.

सहलीला निघेपर्यंत माझी अशी कल्प्ना होती की असतील 20-25 मुलं. पण जेव्हाण 20 तारखेला आम्हीी सगळे रात्री एकत्र जमलो तेव्हाप मला कळालं की एक नाही दोन नाही तब्बाल 82 छोटी (43 मुलं आणि 39 मुली) मुलं होती. मला क्षणभर भीतीच वाटली की आता आपलं कसं होणार? एक तर लहान मुलाला सांभांळणं किती जिकिरीचं काम असतं. आणि आपला तर अशावेळी गोंधळच होतो, इथं तर 10-11 वयोगटातली ही मुलं, कसं सगळं सुरळीत पार पडणार ?

20 तारखेला मध्यारात्री 1 वाजता आमची सहल निघाली. सहलीला निघताना मुलं ज्यान पध्द तीनं ऐकत होती, सूचना पाळत होती, लहान मुलांची मोठी मुलं काळजी घेत होती ते सगळं पाहून माझी सुरुवातीची भीती पळाली आणि खात्री झाली की आता सहल छानच होणार. या मुलांमध्ये राहिल्यामुळे वयानं मोठ्ठे ही माझी संकल्परनाच बदलली. खरंच मोठं कोण? लहान सहान कारणांवरुन भांडणारी मोठी माणसं ? की दुस-याला आपला त्रास होऊ नये म्हलणून समजून घेणारी, समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलं ? (सॉरी, खूप मोठ्ठी मुलं! )

आम्ही 21 तारखेला सकाळी चिपळूण येथे पोहोचलो. माझं हे स्पमष्टीवक्तेपपण कदाचित वाचणा-यांपैकी काहींना आवडणार नाही पण सहलीचं आयोजन चांगल्याा पध्दनतीनं केलं गेलं नाही हे लगेच प्रत्य‍यास आलं. कारण चिपळूणमध्येे कोणाकडे जायचं हेच नीटसं माहीत नव्हेत. आम्हीे अर्धा तास फिरत राहिलो. शेवटी चितळेहॉल शोधत एका ठिकाणी गेलो तर त्यां नाही काहीच कल्पधना नव्हणती. मात्र पाच मिनिटं या प्रकल्पाठवर बोलल्यागवर ते म्हटणाले, “मला काहीही अडचण नाही. तुम्हीं इथं थांबू शकता”. आणि त्यांलनी काही पुढं न बोलता पाणी तापायला ठेवलं. ब-याच माणसांना मदत करायची, चांगलं काम करण्यााची खूप इच्छाह असते पण काही वेळा ती मदत मागीतलीच जात नाही असंही मला वाटलं. तसंच कोणत्याी हॉलवाल्या नं 110 लोकांची सोय स्वततःची गैरसोय करुन केली असती?  आम्हाय सगळ्यांची त्यांकनी उत्तम व्यआवस्थाव केली.

हे सगळं होताच आम्हायला ज्या चितळ्यांकडे जायचं होतं त्यां चा अखेर पत्ता सापडला. आमच्याहतले निम्मेा लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची चहा-नाश्याहो  ची सोयही केली होती. पण त्यान चितळे (हॉलवाले) ना हे माहीतही नव्ह त तरी त्यांॉनी आमची सोय केली त्यां चा मला अभिमान वाटत होता. अर्थातच आम्हालला अभिप्रेत असलेल्या चितळेंनीही आमची उत्तम व्यअवस्था केली.

सर्व आवरुन आम्ही 11.30 ला शिवसृष्टीअदर्शन येथे जाण्यास निघालो. मी आणि योगेश यांनी 5 नम्बथर गटाची जबाबदारी घेतली. आम्हाला तसं पहाता काहीही करायचं नव्हमतंच. कारण आमच्या  गटात 10 जण होते आणि त्या‍तला अर्जुन हा 8 वर्षाचा मुलगा हा गटप्रमुख होता. लिडर म्हणजे काय, तो कसा सर्वांना समजून घेतो, सर्वांबरोबर सतत असतो, याचे धडे या लहान मुलांकडून घ्यातयला हवे. शिवसृष्टी दर्शन खूपच छान झाले. मला सारखं वाटायचं की आता ही मुलं गोंधळ घालतील आणि मग मला जरा काम मिळेल. पण नाहीच. संपूर्ण प्रवास मुलांनी गोंधळ केलाच नाही.

माझा स्वगतःबददलचा एक पक्का समज होता की आपल्याकला लहान मुलांसोबत अजिबात खेळता येत नाही, बोलता तर अजिबातच येत नाही. काही प्रमाणात हा समज खरा म्हणता येईल. आणि अनेकदा तसा अनुभवही आला आहे पण...

ही सहल इतकी वेगळी होती. दुपारी मी कागदाच्याक काही वस्तू  करायला सुरुवात केली आणि काय... लहान, मोठी सगळीच मुलं मला मला करीत एकच गोंधळ सुरु झाला. मला शिकवा, मला पण... अरे बापरे, कोणाकडेही न जाणारी ही मुलं, हातात कॅमेरा (कागदाचा) घेऊन माझ्याकडे धावत सुटली. पक्ष्यां चे पंख फडफडले आणि मुलांचा पुनश्चर गोंधळ सुरु झाला. कागदाच्याु कोल्ह्या ने मुलांची नाकं पकडली आणि मुलांच्याच चेह-यावर हास्य  पसरलं. ओरिगामी शिकवणा-या शाळेतल्याय बाई, माझे वडील, काका, काही मित्र, आणि अनिल अवचट या सर्वांचे मी मनातून खूप खूप आभार मानले. हॅट्स ऑफ!  की ज्यांभच्याचमुळे मी मुलांच्यात एवढ्या जवळ जाऊ शकलो आणि मुलंही यामुळं माझ्या जवळ आली.

पण वाईट गोष्ट अशी की माझ्याकडे पुरेसे कागद नव्होते. मला खूपच वाईट वाटलं. मी फक्त  काहीच मुलांना कागदाच्याव वस्तू. करुन देऊ शकलो. ज्यांनना मला हे देता आलं नाही त्या चं मला टोचणी लागलीच. पण हेही लक्षात आलं की या अनुभवातूनच शिकायचंय. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही!

संध्यांकाळी 4 वाजता आम्ही समुद्रावर पोचलो. तिथं खूपच धमाल आली. माझ्यातला गुंडपणा उफाळून वर आला. मी एकेकाला धरुन सरळ पाण्यापत बुडवून काढलं. इतरांवरही पाणी उडवत राहिलो. मुलंही मस्तन मजा करीत होती. गुडघाभर पाण्या च्यार पुढं जायचं नाही ही सूचनाही तंतोतंत पाळत आनंद घेत होती. पोरं वाळूत मनसोक्तआ खेळत होती. शंख, शिंपले गोळा करीत होती. माझ्याकडे कॅमेरा नव्ह ता याचं मला अतीव दुःख त्याक्षणी झालं.

सूर्यास्त  तर अप्रतिम होता. इतर ठिकाणांपेक्षा हा सूर्यास्ति पहाणं म्ह णजे एक वेगळाच अनुभव होता. बस्सत, फक्त  बघतच रहावं, दूर दिसणा-या होड्या, उडणारे पक्षी, समुद्रात हळूहळू बुडणारा सूर्य आणि त्या्चा लालेलाल तेजस्वी पण बघता येइल असा गोल गोळा...व्वा!  काही गोष्टी तर शब्दाडत न पकडता येणा-या असतात....

तिथून मात्र आम्ही रत्नागिरीला मुक्काममाला पोहोचलो. तिथं मस्तम गरमागरम पुरीभाजी, शिरा, भात असं जेवण करुन ताणून दिली. रात्री डासांनी आमच्यारवर भरपूर ताव मारला ही गोष्टग निराळी.

दुस-या दिवशी म्हरणजे 22 तारखेला सकाळी आवरुन आम्हीव 11 वाजण्याच्या सुमारास भरपूर नाश्ता‍ करुन व सोबत जेवण घेऊन बाहेर पडलो. वेळणेश्वबर या प्रसिध्दन टेकडीवरील मंदिरामध्येव जाऊन दर्शन घेतलं. आजुबाजूला डोंगराळ भाग आणि मस्तत जंगलाचा परिसर होता. तिथून आम्हीस गणपती पुळे येथे जायला निघालो. मध्येस वाटेत एक बस बंद पडली. मग काय, तासभर वायाही गेला. रस्याग क त स्वाेमी स्वररुपानंद यांचं मंदिर होतं, तिथंही जाऊन आलो. गणपती पुळ्याला पोहोचलो तर उन प्रचंड पडलं होतं. आणि भूकही चांगलीच लागली होती. आणि समुद्रही एकीकडे खुणावत होता. पण आधी जेवण, मग थोडी विश्रांती आणि नंतर समुद्र असा प्राधान्यिक्रम ठरवून आम्ही  त्यादप्रमाणेच कृती केली.

मी तर समुद्रावर खूप फिरलो. पाण्या तून विचार करीत करीत इतका चालत गेलो की किती दूर गेलो आहोत याचा अंदाजच आला नाही. आत्ता असं लक्षात येतंय की समुद्राचं हे वैशिष्ट्य च असावं की त्या् पाण्यामतून आपण पुढे चालताना कळतच नसावं. कारण लाटा अलगद आपल्या  पायावर येतात, हळूवारपणे आपल्याा पायाखालून वाळू नेतात. परत एक नवीन लाट येते आणि तिच्याअसोबत थंडावा देणारी एक झुळूकही आणि त्याय येणा-या धुंदीतच आपण चालतच रहातो. कितिक वेळ...

जवळपास अर्धा तास चालल्यायवर मला आपण दूरवर आल्यासचं लक्षात आलं. तिथून मंदिर अगदीच छोटं दिसत होतं. आणि परतण्यासाठी फक्त 15 मीनिटं शिल्लक होती. हे लक्षात येताच मात्र मी पाण्याितून अक्षरशः पळत सुटलो. पण पाण्या तून सावकाश चालणं जेवढं आल्हाणददायक तेवढंच पळणं मात्र तापदायक...पण करतो काय ?

धापा टाकत परत पोहोचलो सगळी निघायच्या  बेतात होती. मी हुश्शत केलं आणि पुढच्यार वेळी घड्याळाकडे लक्ष ठेवायचं असं मनाला बजावलं. या सगळ्यात जेवण, विश्रांती गेली याचा मात्र जराही पश्चाणताप झाला नाही. कारण माझी ही समुद्रफेरी खूपच छान झाली. (हं बरोबर सोबत कोणी असतं तर अजून खूपच मजा आली असती हेही तितकंच खरं...)

आणि 5 वाजल्यांपासून परतीचा प्रवास सुरु झाला. जरासा कंटाळलोही. मात्र मला गाडी चालवणा-या ड्रायव्हलरकाकांचं खूपच कौतुक वाटलं. दोन दिवसात जवळपास 18-20 तास त्यां नी ड्रायव्हिंग केलं. एक रात्र तर संपूर्ण जाग्रण केलं पण जराही कुरकूर नाही की तक्रार नाही. उलट म्ह णाले, मुलांकडे बघून थकवा येतच नाही. उलट उत्साकह येतो. मी त्यां च्या शी चांगल्याेच गप्पाबही मारल्याव.

या संपूर्ण प्रवासात मी कितीतरी गोष्टीय शिकलो. काही शब्दाीत सांगता येतील आणि काही सांगताही येणार नाहीत अशा... नाव पुढे पुढे न करता नावाशिवाय कामं करणारी, श्रेय न घेणारी, काम महत्वा्चं मानणारी, मुलांच्या आनंदाकरता काम करायचं बाकी गोष्टींवचा बाऊ न करणारी माणसं बघितली. लहान वयात हेवेदावे, भांडणं विसरुन मोठी झालेली मुलंही बघितली. छोट्या छोट्या गोष्टीित आनंद मानणारी मुलं बघितली. आणि विचारात पडलो की आपण तर असं काहीच करत नाहीत. घरात 10-10 जोड कपडे असूनही दिवाळीत नवे कपडे घेतोच, मोठ्या भावाला जास्ती फटाके आणले म्ह,णून भांडणारे भाउ, फराळाला लाडू केले नाही म्हरणून आईवर चिडणारी मुलं हे सगळं कुठे आणि एक चॉकलेट मिळालं की आनंदात त्याआ चॉकलेटच्याम कागदाचीही वस्तू बनवण्याडस उत्सूक असलेली, कोणाच्यातरी कुशीत प्रेमानं झोपता आलं म्हंणून, प्रेमानं कुणी थोपटलं म्होणून आपल्याच ताई-दादांचं ऐकणारी, लहानलहान गोष्‍टींत सुख शोधणारी ही मुलं कुठे आणि...

पुढच्या  दिवाळीत कमीत कमी 5-6 मुलांना तरी मी माझ्या घरी घेऊन येणार हे नक्की, असं ठरवूनच मी सुखानं झोपेच्या स्वाधीन झालो. 

-सिद्धार्थ प्रभुणे

Tuesday, December 22, 2009

माहितीचा अधिकार आणि मी

ऑगस्‍ट 25, 2009, च्‍या दै. लोकसत्तामधील एक बातमी आली होती ‘धान्याधारित मद्यार्कनिर्मितीसाठी सरकारची खैरात; उत्पादनशुल्कात भरीव माफी’ बातमी वाचून धक्‍काच बसला. संत्र, द्राक्ष्‍यासारखी फळंही कमी पडली की काय म्‍हणून आता सरकारनं चक्‍क जीवनावश्‍यक धान्‍यापासून दारु बनवायचा घाट घालावा ? आणि ही प्रक्रिया स्‍वस्‍त व्‍हावी म्‍हणून दारु उत्‍पादकांना सरकारनं सबसिडीही जाहीर केली. रॉकेल, घरगुती गॅस, रासायनिक खतं, किटकनाशकं यांना सबसिडी देणं एकवेळ ठीक पण दारुला सबसिडी? कशासाठी ? तर म्‍हणे धान्‍यापासून दारु बनवणं हे मळीपासून दारु बनवण्‍यापेक्षा महाग असतं. आता उद्या सरकारनं सिगारेटलाही सबसिडी जाहीर केली तर त्‍यात आश्‍चर्य वाटायला नको. का तर यातून त्‍यांना महसूल मिळतो.





 धान्याधारित मद्यार्कनिर्मितीला प्रोत्साहन देण्‍याचा महाराष्‍ट्र सरकारचा निर्णय अत्‍यंत चुकीचा आहे हे कोणालाही पटेल. दारुमुळे बेचिराख, उध्‍वस्‍त होणारी माणसं, संसार दिसत असताना सरकारनं दारु निर्मितीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सबसिडी द्यावी हे योग्य नाही. एका बाजूनं ग्रामपातळीवर दारुबंदी योजना मांडायची आणि दुस-या बाजूनं फक्‍त काही धनदांडग्‍या  राजकारण्‍यांच्‍या स्‍वार्थासाठी अशा प्रकारच्‍या योजनांना सबसिडी देउन त्‍यांना आणखी धनवान करायचं तेही सर्वसामान्‍यांच्‍या पैशातल्‍या करांतून हे पटत नाही.

ही सबसिडी देण्‍यामागची सरकारची भूमि‍का अशी आहे की, ‘गेल्‍या काही वर्षांमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यात ज्‍वारीचं दरएकरी उत्‍पादन व ज्‍वारीच्‍या पिकाखालील एकूण क्षेत्रकमी होत आहे. या सबसिडीमुळे दारुच्‍या     निमित्ताने ज्‍वारीचं उत्‍पादन वाढेल व शेतक-यांना त्‍यांच्‍या मालाला योग्‍य  भाव मिळेल आणि विदर्भ-मराठवाडयातल्‍या शेतकर्‍यांच्या आत्‍महत्या कमी होतील.’ खरं पहाता, विदर्भ-मराठवाड्यातील ज्‍वारी, बाजरी इ. पिकांचे उत्‍पादन कमी असण्‍यामागे सिंचनाचा अभाव, नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे यांचा अभाव ही काही प्रमुख कारणं आहेत. द्यायची सबसिडी तर शेतक-यांना द्या. दारुउत्‍पादकांना का ?

तसंच धान्‍याधारित मद्यार्क निर्मितीतून किती प्रमाणात पिण्‍यासाठीची दारु व औद्योगिक वापरासाठीचे अल्‍कोहोल तयार व्‍हावे यावरही सरकारने काहीच नियंत्रण ठेवलेलं नाही. यावरुन हेच स्‍पष्‍ट होतं की सरकारमधील काही स्‍वार्थी राजकारण्‍यांसाठीच ही योजना साकार झाली आहे. सर्वसामान्‍यांना या योजनेपासून होणा-या दूष्‍परिणामांना तोंड द्यावं लागू नये यासाठी आपण एकत्रितपणे विरोध केलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्‍या हाती एक मोठं शस्‍त्र आहे. ते म्‍हणजे माहितीचा अधिकार यानेके RTI !

माझा आरटीआयचा अनुभव ऐकायचाय?

सचिनच्‍या सांगण्‍यावरुन 7 नोव्‍हेंबरला मी धान्‍याधारित मद्यार्क निर्मितीच्‍या राज्‍य उत्‍पादनशुल्‍क विभागात आरटीआयचा अर्ज दाखल केला. मला अगदी मनापासून सांगावं वाटतं की अर्ज दाखल करताना मला आरटीआयविषयी काहीही माहिती नव्‍हती. त्‍या दिवशी पब्लिक इन्‍फर्मेशन ऑफिसर हे उपलब्‍ध नव्‍हते. मी अर्ज तर दाखल केला आणि वाटलं आता 30 दिवसांत कधीतरी उत्तर येईल. तत्‍काळ उत्तराची अपेक्षा नव्‍हतीच.

दोन-तीन दिवसानंतर एका सायंकाळी मला माझ्या मोबाईलवर माहीत नसलेल्‍या व्‍यक्‍तीचा मिसकॉल दिसला. कोणी केला असेल या कुतूहलापोटी मीही मिस कॉल पुनश्‍च त्‍या नंबरला दिला. आणि लगेच मला त्‍या नम्‍बरवरुन कॉल आला. ती व्‍यक्‍ती बोलत होती, “आपण वाकळे ना ? मी उत्‍पादनशुल्‍क विभागातून पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर पुजलवार बोलतोय. तुम्‍ही दाखल केलेल्‍या अर्जाविषयी बोलायचंय....” मी तर एकदम गोंधळूनच गेलो. इतक्‍या लवकर प्रतिसाद आणि तोही असा एकदम मोबाइलद्वोर म्‍हणजे मी कल्‍पनाही केली नव्‍हती.  कसंतरी स्‍वतःला सावरत मी त्‍यांच्‍याशी बोललो. आमची भेटीची वेळ ठरली. त्‍यांच्‍याकडे जी कागदपत्रं आहेत ती मी जरुर बघावी असंही त्‍यांनी सुचवलं.

सरकारी अधिका-याच्‍या या सौजन्‍यशील आणि तत्‍काळ प्रतिसादानं मी जाम सुखावलो. खरंतर त्‍यांचं अभिनंदनच केलं पाहिजे असंही मला वाटलं. आणि मी दुस-या दिवशी छानशी टवटवीत अशी दोन गुलाबांची फूलं घेऊन त्‍यांच्‍या भेटीला गेलो.

दुपारी एकच्‍या सुमारास मी त्‍यांना भेटलो. त्‍यांचं अभिनंदन केलं. मी देऊ केलेली फुलं त्‍यांनी मनापासून स्‍वीकारली. पुजलवार हे अधिकारी वयानं 40 ते 45 च्‍या आसपास असावेत. त्‍यांच्‍याकडील पद हे प्रभारी स्‍वरुपाचं होतं. त्‍यांनी सरळ मुद्याला धरुनच बोलणं सुरु केलं. ते म्‍हणाले, “तुम्‍ही विचारलेली सगळी माहिती आमच्‍याकडे उपलब्‍ध नाही ती मुंबई आणि कारखान्‍यांकडून मागवावी लागेल. पण सध्‍या काही प्रकल्‍पांची कागदपत्रं आहेत. ती तुम्‍ही पाहू शकता”.

मी त्‍यांनी दिलेल्‍या फाईल्‍स बघितल्‍या. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार सध्‍या आदित्‍य ब्रेव्‍हरिजचं भेंडोळे इथे उत्‍पादन सुरु झालं आहे आणि प्रणव ऍग्रोटेक यांचंही उत्‍पादन सुरु होणार आहे.मी त्‍यांना सध्‍या उत्‍पादन घेत असलेले आणि मंजूरी मिळालेले कारखाने यांची कागदपत्रं मला हवी आहेत असं सांगितलं. तसंच उत्‍पादन सुरु नसलेल्‍याही कारखान्‍यांची कागदपत्रं मिळावीत असं सांगितलं. त्‍यांनी मला त्‍या कागदपत्रांच्‍या फोटोकॉपीज दिल्‍या.

माझ्याशी त्‍यांनी गप्‍पाही मारल्‍या. मी त्‍यांना लोकसत्तामधली बातमी दाखवली. पण त्‍यांनी विशेष उत्‍सुकता दाखवली नाही. येत्‍या 2-3 दिवसांत मी राहिलेली कागदपत्रं देतो असं त्‍यांनी सांगितलं. कामासंदर्भात ते काही वेळासाठी बाहेर निघून गेले.

त्‍यांच्‍या कार्यालयातील एक सहकारी धुमाळ यांच्‍यासोबत मी बसलो. मनात विचार करीत होतो, येताना नाही म्‍हटलं तर एक भीती घेऊनच मी आलो होतो. काय बोलायचं, काय मिळवायचं याचा हिशोब मनात करीत बसलो होतो. इतक्‍यात समोरनं दोन पोलीस आले आणि ते धुमाळांशी काही बोलू लागले. माझ्या मनात भीतीनं जास्‍तच ठाण मांडलं. मला एकाएकी 6 नोव्‍हेंबरला इंडियन एस्‍प्रेसमध्‍ये आलेली बातमीच आठवली. 42 harassed; many in jail for seeking into under RTI in Bihar… आठवून अंगाला कापरं सुटलं. वाटलं पुजलवारांनी हे पोलीस आपल्‍यासाठीच तर नाही ना पाठवले. पण ते सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. पोलीस धुमाळांशी बोलून निघून गेले. आणि अर्ध्‍या तासानंतर मला राहिलेल्‍या कागदपत्रांची झेरॉक्‍स मिळाली. बाकी माहिती मला 2-3 दिवसांनंतर मिळेल असं त्‍यांनी सांगितलं हेातंच. मी निघताना झेरॉक्‍स कागदपत्रांच्‍या पैशांविषयी विचारणा केली. पण त्‍यांनी ते घेतले नाहीत. मी मिळालेल्‍या कागदपत्रांसहित बाहेर पडलो.

असा माझा आरटीआयचा अनुभव मजेशीर राहिला. मला त्‍यातून माहितीच्‍या अधिकाराविषयी बरंच शिकायला मिळालं. खरं सांगायचं झाल्‍यास माझ्यातल्‍या एका सामान्‍य नागरिकाला माहितीच्‍या अधिकाराची ताकद किती आहे याचा एक छानसा अनुभव आला.

अधिक माहितीसाठी: www.foodtoalcohol.wordpress.com

-अमोल वाकळे

Thursday, December 3, 2009

माणगावला भेट

गडचिरोलीतल्या रोजगार हमी योजनेच्या कामाच्या संदर्भात एखाद्या कार्यक्रमात लोकांना कसे सहभागी करायचे, संघटित कृती कशी घडवून आणायची, त्याच्या पद्धती काय असतात इत्यादी बाबत मनात विचारमंथन सुरु होते. सचिन तिवले याला नंदूरबार जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करतांना असेच काही प्रश्न पडत होते. उल्का महाजन ह्या रायगडातील काही तालुक्यांमध्ये लोक संघटनातून चांगले काम घडवून आणत आहेत अशी माहिती दत्ता बाळसराफ यांनी दिली आणि त्यांनी आमची तशी भेट आयोजित सुद्धा केली.

निर्माण फेलोशीपची कार्यशाळा संपवून सकाळी मी आणि सचिन पुण्याहून माणगावला निघालो. वाटेत ताम्हिनी घाट लागला. पावसाळा नुकताच संपलेला असल्यामुळे डोंगर हिरवेगार दिसत होते. घाटातनं प्रवास करत असतांना दोन वर्षांपूर्वी सायकलीवरुन केलेल्या पुणे ते रायगड अशा मुशाफिरीच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या. गाडीच्या भरधाव वेगामुळे कधी कधी मनाला भीती वाटायची आणि ते (मनातल्या मनात!) ड्रायव्हरला ओरडून सांगायचे, “सावकाश रे बाबा! मला अजून जगायचं आहे. काही करुन दाखवायचं आहे.”
अकराच्या सुमारास सुखरुपपणे माणगावला पोहोचलो. टुमदार घरे न्याहाळत, चिखल तुडवत, रस्ता चूकत आम्ही ‘सर्वहारा जन आंदोलना’च्या कार्यालयात पोहोचलो. कुठेही संघटनेचे बोर्ड, बॅनर किंवा पोस्टर असं काहीचं दिसत नव्हतं. तीन खोलींच्या त्या कार्यालयात दोन कपाटं, एक लाकडी टेबल, काही खुर्च्या आणि स्वयंपाकघरातील काही भांडी असे मोजके सामान होते. मागाहून आम्हाला कळालं की संघटनेचं कार्यालय सुद्धा कायमस्वरुपी नव्हतं आणि संघटनेकडे स्वतःची अशी स्थावर मालमत्ता नाही. “आम्हाला त्याची गरजच वाटत नाही”, उल्काताई सांगत होत्या, “आर्थिक असुरक्षितता ही आमची ताकद आहे”. त्यांच्या मते जर संघटना लोकांसाठी काम करत असेल तर लोकच संघटनेला मदत करतील. (हा मुद्दा प्रचंड ‘वादनीय’ आहे.)

कार्यालयात हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. त्या दिवशी ‘विधानसभा निवडणूकीत संघटनेची राजकीय भूमिका काय असावी’ या संदर्भात एक मिटींग आयोजित करण्यात आलेली होती. मिटींगला जवळजवळ ७० लोक उपस्थित होते. त्यात ४५ तरी महिला असतील. आदिवासी महिलाही पुढाकार घेऊन स्वतःची मतं मांडत होत्या. त्या कातकरी लोकांच्या चेहर्या वर उंचावलेला आत्मविश्वास (self confidence) तर बोलण्यात राजकीय कृतीशीलता (political activism) स्पष्टपणे जाणवत होती. मिटींग खुपच लोकशाही पद्धतीने झाली. उल्काताई स्वत: कमी बोलत होत्या (जे अनेक नेत्यांना जमत नाही.). संयमाने चर्चा घडवून आणत होत्या.

मिटींगच्या समारोपानंतर उल्काताईंशी बोलायला सुरुवात केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषणाविरुद्ध संघर्षात्मक काम ही कार्यपद्धती आधीच ठरलेली. जुन्या व्यवस्थेतील सरंजामी आणि नव्या बाजारु, भांडवली अर्थव्यवस्थेतील काही लुटारु प्रवृत्तींविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यात मुख्यत: लोक संघटन, मोर्चा, धरणे, उपोषण, सत्याग्रह, राजकीय पाठींबा, विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणे इत्यादी पद्धतींचा वापर असतो. शोषणासंबधीचे जसजसे मुद्दे येत गेले, त्यानुसार त्यांचे काम आकारास येत गेले. सुरुवातीलाच त्यांना किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. लोकही त्या बाबतीत बोलायचे. प्रत्यक्षात तो प्रश्न हाताळतांना लोकसहभाग मिळालाच नाही. त्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की जरी किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्या प्रश्नाला इतरही सामाजिक, आर्थिक बाजू आहेत. तो ‘प्रक्षोभक’ मुद्दा लोकांना आणि संघटनेला सुद्धा अगदी सुरुवातीला पेलवणारा नव्हता. मग काही काळ लोकांमध्ये राहून, संवाद साधून दळी जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला. लोकांची ती महत्त्वाची गरज असल्यामुळे उल्काताईंना लोकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. त्यानंतर संघटनेला लोकांकडे कधी जावे लागले नाही. लोकच संघटनेकडे येवू लागले. प्रश्न निवडताना उल्काताईंची भूमिका स्पष्ट होती, प्रश्न जर लोकांना आपला वाटत असेल आणि जर लोक त्या प्रश्नावर काम करायला तयार असतील तरचं तो प्रश्न निवडायचा. लोकांच्या योग्य प्रश्नाला हात घालणे ही लोकसहभाग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे असं जाणवलं.

लोक तुकड्या तुकड्यात आयुष्य जगत नसतात. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. म्हणून लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्या इतर आयुष्यात सुद्धा आपण सहभागी झाले पाहिजे अशी उल्काताईंची भूमिका. (We can’t see a problem in isolation.) ही भूमिका तत्व म्हणून बरोबर आहे. तिच्या व्यावहारिकते बद्दल मत मांडण्याइतपत मला अनुभव नाही.

या भूमिकेतून जमिनीचे प्रश्न, वनहक्काचे प्रश्न, रेशनिंग, दलितांचे प्रश्न, वेठबिगार, वीटभट्टी कामगारांचे प्रश्न इत्यादी शोषणविषयक विविध प्रश्न त्यांनी हाताळले. काही व्यक्तिगत तक्रार निवारणाच्या स्वरुपाचे प्रश्न सुद्धा हाताळले. असे काही प्रश्न हाताळतांना व्यापक परिमाण असलेले प्रश्न त्यांच्या लक्षात आले.

सर्वहाराचं काम जवळपास ७०० गावं आणि वाडयांमध्ये चालतं. विविध गावशिबिरांच्या माध्यमातून संघटना या गांवातील लोकांना संघटनेशी जोडून ठेवते. या गावशिबिरातील विषय आणि सत्र ही गावनिहाय बदलतात. “या शिबिरांची विशेषता म्हणजे ही शिबीर कृतीशील असतात” उल्काताई सांगत होत्या. “जर रेशनिंगच्या

प्रश्नावर शिबिरात पथनाट्य गावकर्यांशनी सादर केलं असेल तर त्या पथनाट्याचाच एक भाग म्हणून गावातील लोक रॅली करुन गावातील रेशनिंग दुकानावर जातात आणि त्या दुकानावरील तक्रार पुस्तकात आपली तक्रार नोंदवतात. अशा लहान-सहान कृती आम्ही शिबीरातच लोकांकडून करवून घेतो.”

उल्काताईंशी बोलतांना जाणवलं की लोकसहभागासाठी ठराविक, साचेबद्ध पद्धती (thumb rules) नसतात. लोकांशी संबधित वस्तुस्थितींचे योग्य आकलन मात्र अत्यंत महत्त्वाचे (अगदी निर्णायक म्हटले तरी चालेल) असते. निव्वळ लोकांशी संवाद साधून, प्रश्न विचारून लोकांच्या खर्या समस्या कळतातच असे नाही. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ते समजून घेण्यासाठी लोकजीवनात प्रत्यक्ष सहभाग, सहवास आणि सहकृती महत्त्वाचे ठरतात. सुक्ष्म निरीक्षण, आजुबाजूला घडणार्याच विविध घटनांचे अन्वयार्थ, आंतरसंबंध समजून घेणे, विश्लेषण करणे ह्यातूनच खर्यान समस्या कळू शकतात. निर्माण फेलोशीपच्या कार्यशाळेत आनंद करंदीकर सुद्धा म्हणाले होते, डोळ्यांना दिसणारी, वरकरणी खरी वाटणारी वस्तुस्थिती ही सहसा फसवी असते. खरी वस्तुस्थिती गुंतागुंतीची असते. म्हणून आपल्या आकलनाला वारंवार तपासून घेणे गरजेचे असते. ‘मला अतिंम सत्य समजले’ अशी गुर्मी आपल्याला चुकीच्या दिशेने नेते.

रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यात त्यांची संघटना काम करते. उल्काताई वगळता संघटनेतील बहुसंख्य कार्यकर्ते स्थानिक आहेत. प्रश्न सोडवतांना ते संघटनेशी जोडले गेले. १३ पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. गावपातळीवर गाव समिती, तालुका पातळीवर गावातील निवडक कार्यकर्त्यांची तालुका समिती, पूर्ण वेळ काम करणारी मुख्य कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळ अशी संघटनेची रचना आहे. संघटनेशी जोडून घेण्यासाठी लोकांना तिचे सभासद व्हावे लागते. त्यासाठी २५ रुपये वार्षिक वर्गणी भरावी लागते. लोक संघटनेचे भागधारक (shareholder) आहेत. लाभार्थी (beneficiary) नाहीत. लाभार्थीच्या भूमिकेतून लोकांना बाहेर काढले की लोक सक्रिय होतात आणि लोकांचा सहभाग वाढतो असं दिसून आलं. हे अजून तपासून पहावं लागेल.

संघटनेची चिठ्ठी हे एक अजब प्रकरण आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर झालेला अन्याय संघटनेसमोर मांडला तर संघटना समोरच्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून चिठ्ठी पाठवते. ती व्यक्ती पुढील चर्चेसाठी संघटनेच्या कार्यालयात स्वत: हजर होते. असे ९०% वेळेस घडते. यावरुन संघटना पर्यायाने लोक एक दबाव गट (pressure group) म्हणून यशस्वी ठरत आहेत असे दिसते.

उल्का महाजन या मूळच्या कोल्हापूरच्या. निर्मला निकेतन महाविद्यालयातील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या सुवर्ण पदक विजेत्या. माणगावात कामाला सुरुवात केली तेव्हा त्या आणि त्यांची एक मैत्रिण अशा दोघीच होत्या. त्यांच्या आधी या भागात कुठल्याही प्रकारचे स्वयंसेवी काम झालेले नव्हते. त्यांना कुठलाही संस्थात्मक आधार सुद्धा नव्हता. सुरुवातीच्या काळात कातकारी लोक वर्षानुवर्षांच्या शोषणातून तयार झालेल्या अविश्वासामुळे त्यांच्याशी बोलायला सुद्धा तयार नसत. घरातनं पाणी सुद्धा मिळायचे नाही. तरीही त्यांनी माघार घेतली नाही.

त्यांच्या कामाच्या संघर्षात्मक पद्धतीमुळे हितसंबंध गुंतलेल्या अनेक बड्या व्यक्तींसोबत त्यांचा संघर्ष होत असतो. पण त्या कधी डगमगल्या नाहीत. त्या करत असलेल्या कामासाठी प्रचंड धैर्य आणि त्यागाची तयारी लागते. ‘मेरा क्या होगा’ हा व्यक्तिगत प्रश्न त्यांना कधी पडला असेल असं वाटत नाही.

स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळींमधील कार्यकर्त्यांमध्ये विधायक काम की संघर्ष असा पेच असायचा. काही कार्यकर्ते ‘विधायक कामात संघर्ष नसतो असे कुणी सांगितले? आणि संघर्षात्मक काम विधायक असतेच की’ अशी भूमिका घेत. जागतिकीकरणाच्या, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या आजच्या युगात सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पना बदलत आहेत. अशा काळात संघर्षात्मक कामाची नेमकी भूमिका काय ह्याचा शोध घ्यायला हवा. एखादी जुनी, कालबाह्य किंवा शोषणावर आधारित व्यवस्था बदलण्यासाठी लोकसंघटनातून संघर्ष आवश्यक ठरतो का? की नवी व्यवस्था इतकी शक्तिशाली आणि क्रांतिकारी असते की जुनी व्यवस्था कालबाह्य ठरुन आपोआप गळून पडते?

रोजगार हमीच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी ‘लोकसंघटनातून संघर्ष’ या कामाच्या पद्धतीतून काही गोष्टी निश्चित घडवून आणता येतील. पण त्या अपूर्याू ठरतील. जोवर रोहयोच्या अंमलबजावणीसाठीच्या व्यवस्थेत काही मूलभूत बदल होत नाही तोवर रोहयोची कार्यक्षमता वाढणार नाही. ज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा वापर करुन रोहयोची अंमलबजावणीची व्यवस्था कित्येक पटींनी कार्यक्षम करता येणे शक्य आहे. मात्र रोहयोला लोकोपयोगी बनण्यासाठी सामान्य माणसाचा योजनेतील सहभाग वाढलाच पाहिजे. तिथे सुद्धा ज्ञान – तंत्रज्ञानाधारित साधनांचा प्रभावी उपयोग करुन घेता येणे शक्य आहे असे रोहयोच्या अनुभवावरुन मी सांगू शकतो.

वेळेअभावी मनातले अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यांच्यासोबत पुढे चालू राहणार्‍या संवादातून कदाचित उत्तरे सापडतील.

-गोपाल महाजन , सचिन तिवले