Friday, June 19, 2009

Letters to Shivani

Whenever difficult terms and concepts are told in simple format they are better digested. Here is a book which tries to summarize and make us understand basic concepts of ‘Bharateey sanskriti’. Bharateey sanskriti was written by Sane Guruji in 1937. He tried to explain different facets of Indian culture. In this book, he has given different relevant examples from Vedas, puranas and worldwide history. The most beautiful part of this book is Sane Guruji relates all these concepts to day to day life and makes them relevant to time.

It has become routine to say that now a day people do not follow Indian culture. But have we ever realized the real meaning of culture? Does following an Indian culture just means to blindly follow all traditions of Ganapati and Diwali Festival or does it have a meaning beyond these traditions? Indian culture does not only have great history but also has some vision. Sane Guruji spoke about this vision. In ‘Bharateey sanskriti’ written by sane Guruji, there are 23 articles. Starting from the concept of ‘Advait’ (oneness), he has covered different edges related to culture. He has spoken about importance of knowledge, work, mental and physical health, non-violence etc. The concept of four stages and ends of life as explained in puranas is very nicely explained by him in this book. He has given different Sanskrit shlokas (along with meaning), Marathi stanzas to make them interesting and simple for common people. Language in the book is lively and contains many conversations. We feel as if the writer is talking to us and making us understand the great Indian culture.

The last article in this book is the most touching article, I feel. The title is ‘mrutyuche mahakavya’. The philosophy and the beauty in the concept of ‘death’ infact reveal the beauty of life! Bharateey sanskriti not only looks at life as an art but also at death!!

कर ले श्रिंगार चतुर अलबेली.
साजन के घर जाना होगा..

मिट्टी ओढावन मिट्टी बिछावन..
मिट्टीमें मिल जाना होगा..

नहाले घोले शीस गुंथा ले..
फिर वहांसे नही आना होगा..

Converting such beautiful yet difficult concepts in simple article form can not be an easy task. G.P.Pradhan has written 18 letters in the book ‘letters to Shivani’.He has focused on important concepts. Language is simple. Even though he has attempted to write all the articles in ‘letter form’ (as a sane Guruji had done in ‘sunder patre) they do not really have a feel of letters.

So, ‘Letters to Shivani’ is a simple book to understand few facets of Bharateey sanskriti and sane Guruji but it is not at all a replacement for the book ‘Bharateey sanskriti’ written by sane Guruji.

-Mukta Gundi

Saturday, June 13, 2009

अनुभव

On last saturday, myself along with Anwar, and Anwar's friends went to an orphanage in Dapodi, Pune. It is located in a slum-like area and run by Mrs Tulve who started it in 2000. On reaching there we had a discussion with Tulve Kaku (or simply Kaku now onwards).

The story goes like this in her words-

"I was in affection with orphan kids from times even before starting the orphanage. Once I saw a small orphan girl raped by somebody and the girl was left on road with her pains. I rushed that girl to hospital but she died in a few days. I was shocked to see this. Then I came across 3 orphan kids and asked an existing orphanage if they could admit the kids. The orphanage refused to admit the girls because girls are needed to be provided with extra social security. I found this weird because that is what purpose of an orphanage is.

So I decided to start an orphanage myself with these 3 kids in the year 2000. I registered it with few other ladies from my colony. Later on, looking at the responsibilities, the rest of the ladies left the work, but I couldn't and didn't want to. I had few conflicts with my family initially but later on my family not only accepted it but encouraged me and started contributing to my work.

There are always days of problems. We had few funds and ourselves not being from elite class, we had to manage our expenses and expenses of the orphanage from my husband's salary at times. In October, I got one more shock. My husband (aged around 45-50) expired in October 2008. It is hard to see him not here with us, but I have to go ahead with my kids."

One might feel that only money is the major problem for running an orphanage. But there is a huge list of problems. There are kids of all age, even some of the kids are brought into the orphanage the very day they were born. To grow up these kids, to look after their education, their eating habits, nourish them emotionally is not an easy task. Also, the distant relatives of the kids rise all of a sudden and take them away without thinking about the kid's education. In that case, she has to convince the kid's relatives, even file a police case at times. The elderly girls have to be given more protection. The problem listed here can be an indication to the actual list.

On asking her where did she apply for any grant from the government, Kaku exclaims "Yes, we did. Firstly they said, I need a bigger place to get a grant for orphanage. If I could get it, why would I ask for a grant? Secondly, they asked for a bribe of Rs 25000. My kids will have their food for 2 months in this sum. Why should I pay the officials so much money just on the belief that they will give grant to my orphanage on some day?"

The place where the kids stay are two small rooms of approx. 10 by 12 feet each. Out of which, one has tin on the top (so one can imagine the summer joy). The number of kids staying there is 34. All of them have to use public toilets and bathrooms of the colony. So one can imagine the "luxury" the kids are having. Kaku stays just next to it in a same sized house.

After visiting the orphanage, many questions arose to my mind. Looking after the orphanage, I was convinced that she is doing it genuinely. She is not running an business NGO as many people do just to earn funding and then abuse that funding. Kaku herself is not "formally" educated. So how did she have the courage to go against family and register the orphanage, handle its administrative and legal formalities? She is also not from elite class. So didn't she feel little worried about the future of her family and orphanage? I stay here in my comfort zones and hardly bother to care about somebody under-privileged, talk about taking "calculated risks" and here a lady who is "illiterate" is taking so much "pain" and responsibility when she is not "needed" to have it? How and why could she do this?

I found that she had an extreme urge to do something for the orphan kids without need of heavy words or heavy philosophy. She had found joy and satisfaction in running an orphanage, that is why after so much apparent pain, she is happy with whatever she is able to do it.

Now, what is that we can do?

1. Monetary help. The orphanage still doesn't have grant. So the expenses of the kids food, education, health are entirely based on donation.

2. Find out what all is required in registering and getting a grant for the orphanage. File RTI, visit officers.

3. Work with Kaku, understand the problems they have in getting grant and work with them to apply and followup the grant approval. But this will need frequent visits, concern for them and committment.

Meantime while we were discussing about the grant issue, Kaku said - "The officials say that we don't have separate toilets and bathrooms for the girls and boys. We cannot do better. The girls and boys have to share the same toilet and bathroom of the colony. Now you guys tell me, do we have 3 bathrooms in our home where 5 people are staying?" I didn't have daring to say her that yes we have and we consider it a necessity :(

-Dhananjay

Friday, June 12, 2009

नसत्या इंगळ्या डसल्या नसत्या.......

दया पवार- अर्थात ’दगडू मारुती पवार’. (१९३५-१९९६). स्वत:च्या ’दगडू’ या नावापासूनच त्यांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली. ते दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक. जन्म धामणगावातला (अकोला). १०वी पर्यंतचं शिक्षण संगमनेर इथल्या शाळेत. नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. परळ इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक म्हणून काम पहायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. anatomy department मधे काम करताना मेलेल्या प्राण्यांची कातडी सोलून त्यांची body preserve करण्यासाठी त्यांच्या शिरांमधे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. एका संवेदनशील माणसाला हे काम करताना काय वेदना झाल्या असतील...

त्यांचं बलुतं हे आत्मचरित्र नुकतच वाचून झालं. ’दगडू’नं दयाला सांगितलेलं हे आत्मकथन.जणू स्वतःलाच स्वतःची जुनी ओळख दिल्यासारखं. ”आयुष्यात किमान एकाला तरी घडलेलं सगळं सांगावं” या आईनं दिलेल्या शिकवणीशी प्रामाणिक राहून घडलेलं ’सगळं’ त्यांनी सांगितलं आहे. सगळ्यात शेवट मग ’दया’नं लिहिलेलं एक मनोगत आहे. ही कथा कुण्या ’हिरो’ची नाही. यात आयुष्यात काही ’कर्तबगारी’ करून दाखवलेला कुणी ’पुढारी’सुद्धा नाही. कुठल्याही एकाच कडव्या विचारानं यात बाजी मारलेली नाही. यात एक साधं विश्लेषण आहे. आलेले अनुभव, विचारांचं उठलेलं मोहोळ, जीवनाच्या पटावर भेटलेली टोकाची माणसं.... या साऱ्या भूतकाळाकडे बघणारं एक संवेदनशील मन. स्वतःच्या झालेल्या चुकांवर पांघरूण घालायचा कुठे केविलवाणा प्रयत्न नाही. नरेंद्र जाधव यांनी ”आम्ही आन आमचा बाप” मधे जशी ग्रामीण बोली वापरली आहे तशी बलुतं मधे दया पवारांनी वापरली असती तर ते जास्त जिवंत वाटलं असतं का, असा मनात विचार आला. असो.

आश्चर्य एकाच गोष्टीचं वाटत राहतं की या माणसाचं मन इतक्या भयंकर जीवनानुभवानंतरही इतकं संवेदनशील राहिलंच कसं? दारू आणि स्पिरिट च्या व्यसनी लागलेला बाप, काबाडकष्ट करून नवरा गेल्यानंतरही मुलांना शिकवण्यासाठी कष्ट उपसणारी आई, समाजात सतत वाट्याला येणारी उपेक्षा, शिक्षणामुळे येत असलेलं सामाजिक भान पण ते व्यक्त करत असताना होणारी घालमेल, आजूबाजूच्या स्त्रियांचं हलाखीचं जिणं, लहान वयात पाहिलेले, अनुभवलेले भयंकर प्रसंग या सगळ्यात ’दगडू’ हरवला कसा नाही? किंवा तो नावाप्रमाणे ’दगड’ कसा झाला नाही?? आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांची सत्वपरीक्षा घेतली गेली जणू. त्यांच्या एका कवितेत ’चिलया’ बाळाच्या कथेचा उल्लेख येतो.

”देव एवढे का दुष्ट असतात..

चिलयाचे रक्त,मांस मागतात...?”


...... दया पवारांनी आयुष्यात कधी चिलया बाळाचे तर कधी त्या चिलया बाळाच्या आई-बापाचे अनुभव घेतले.... या कथेला आपण ”भाकड कथा” का म्हणतो?

बलुतंची पहिली edition १९७८ सालची. त्या काळातलं हे साहित्य ’विद्रोही’ म्हणावं का. खरं पाहता बलुतं ने प्रस्थापिताला धक्का दिला पण तरीही ते ’आत्मकथना’च्या पठडीत जास्त चपखल बसणारं आहे. वाट्याला आलेल्या दुःखाचं त्यात शेअरिंग आहे. दुःखाकडे ’अन्याय’ म्हणून बघण्याची त्यात द्रुष्टी दिसत असली तरी ती तितकी ’विद्रोही’ स्वरूपात व्यक्त मात्र होत नाही. ती खरी व्यक्त झाली आहे त्यांच्या ’कोंडवाडा’ या काव्यसंग्रहामधे. बलुतं च्या निमित्तानं मी कोंडवाडा सुद्धा वाचलं. यातल्या कविता दुःख आणि अन्याय या दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, महार समाजाच्या उन्नतीसाठीची आतून व्यक्त होणारी तळमळ, दलित समाजाला, तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केलेलं आवाहन आणि अंतर्मुख होऊन मांडलेला अनुभवांचा लेखाजोखा; हे सारं त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. कोंडवाड्यामधे आणि बलुतं मधे केवळ सामाजिक बाह्य संघर्ष नाही. यात सामाजिक संक्रमणाबरोबर आंतरिक संघर्षही आहे. शिकल्यामुळे होणारं white collar मन आणि त्यातूनच आपल्या समाजापासून तुटल्याची येणारी भावना यात वेळोवेळी व्यक्त झाली आहे.

कोंडवाडाचं मुखप्रुष्ठ बोलकं आहे. त्याचा ३/४ भाग हा दगड-विटांनी बांधलेल्या (एकही खिडकी नसलेल्या) कोंडवाड्याची भिंत आहे. त्या शेजारून एक ठिपक्याएवढा दिसणारा माणूस (ज्याचा चेहरा दिसत नाही. खांद्यावर झोळी आहे. अंगावर कपडे चांगले आहेत) चालला आहे. दया पवार यांची कविता ही त्यांच्या आयुष्याच्या कोंडवाड्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना सापडलेली पायवाट होती. त्यांनी कष्टानं घेतलेलं शिक्षण, केलेलं वाचन एका अर्थानं त्याना मोकळा श्वास घ्यायला शिकवत होतं तर कधी त्यांच्या वेदनांच्या खपल्या उघडणारं होतं. त्यांनी कोंडवाडा कवितेत म्हटलं आहे-


”कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओहोळाचा गोटा..

गावची गुरे वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या..”


दया पवारांची कविता वास्तवदर्शी आहे. ”मला निसर्गात रमणं आणि त्यावर कविता करणं कधीच जमलं नाही.” असं त्यानी म्हटलं आहे. किडे-मुंग्यांकडे कौतुकानं बघण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ते शक्यही नव्हतं. इथे किड्याना खायला रव्याचा दाणा मिळू शकतो पण आमच्यासारख्या माणसांना एक वेळचं खायला मिळेल याची शाश्वती नाही, हे त्यांचं वाक्यच त्यांची मनःस्थिती सांगतं. बलुतं मधे जरी त्यांनी म्हटलं असलं की ही कथा माझ्या पराभवाची आहे तरी तसं पूर्णपणे खरं नाही. ’दगडू’ ते ’दया’ हा प्रवासच मुळी त्यांच्यातला सकारात्मक बदल दाखवतो. कोंडवाडामधे त्या कोंडलेल्या जीवनातून बाहेर येऊन ते म्हणूनच आवाहन करतात-


”प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे

ज्या काजव्यांचा तुम्ही जयजयकार केलात

ते केव्हाच निस्तेज झाले आहेत

आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा

अन क्रांतीचा जयजयकार करा.”
सुरक्षित जगात जगलेल्या माझ्यासारख्या मुलीला बलुतं आणि कोंडवाडा हादरवून सोडतं.......

- मुक्ता गुंडी.

Thursday, June 11, 2009

’बदलते विश्व’ आणि सॉक्रेटिसचे ६ प्रश्न

कुमार केतकरांचं ’बदलते विश्व’ पुस्तक नुकतच वाचून झालं. पुस्तकाबरोबरच मनामधे एक आपसुख विचाप्रक्रिया सुरू झाली. पुस्तकाचे एकूण १० विभाग आहेत. ते वाचकाच्या सोयीसाठी केले असावेत. कारण संपूर्ण पुस्तक एकसंध आहे. कुमार केतकर वेगवेगळ्या विषयांवर स्वतःची मतं नोंदवतात, सर्व बाजूंनी एखाद्या गोष्टीचा विचार मांडतात पण विचारांची साखळी तुटू देत नाहीत. पुस्तकाबरोबर आपले सुरू झालेले विचार पुस्तकाच्या विभागानुरूप बदलत नाहीत तर त्या विचारांची एक साखळी तयार होत जाते. कुमार केतकर हे पुस्तकात अनेक नोंदी, दाखले देतात, आपली मतं ते नोंदवतात, आपल्याला अनेक प्रश्नांच्या वेगवेगळ्या बाजू दाखवतात पण कुठल्याही ’निष्कर्षाप्रत’ येण्याचा अट्टाहास धरत नाहीत. निष्कर्षांच्यासुद्धा अनेक शक्यता आपल्यासमोर मांडल्या जातात. आपण नकळत विचार करायला लागतो. पुस्तकाचं नाव ’बदलते विश्व’ आहे. केतकर या पुस्तकात खरोखरच ’विश्वाविषयी’, त्याच्या इतिहासाविषयी, भविष्याविषयी, प्रश्नांविषयी, झालेल्या, होत असलेल्या चुकांविषयी आणि सामाजिक, राजकीय, मानसिक, आर्थिक परिणामांच्या शक्यतेवर बोलतात.

मला आठवतंय, २.२ च्या वेळी केतकर आले होते. आपण त्यांना कित्तीतरी प्रश्न विचारले होते. अपेक्षित होतं की आपण त्यांचं ’बदलते विश्व’ वाचून यावं. मी वाचलं नव्ह्तं. पुस्तकाचा काहीच भाग मी वाचून आले होते. त्यामुळे ते जी काही उदाहरणं देत होते ती मला क्लिष्ट वाटत होती. सिस्टिम विषयी ते बोलले, दहशतवादाविषयी बोलले पण त्याआधी मी त्यांचा ’माणूस दहशतवादी होतो म्हणजे काय?’ हा लेख जर वाचलेला असता तर मला काही गोष्टी नीट कळल्या असत्या. त्या माणसाचा वाचन, अनुभव यांचा अवाका इतका मोठा आहे की त्यांच्यापुढे बसताना मला ''basic logical and analytical power'' वापरून विषय समजावा इतकं तरी मी वाचलेलं असलं पाहिजे!

त्यांच्या एका लेखात त्यांनी क्रिस्टोफर फिलिप्स यांच्या 'सिक्स क्वेस्चंस ऑफ सॉक्रेटिस' या पुस्तकाचा उल्लेख केला आहे. हे ६ प्रश्नसुद्धा त्यांनी दिले आहेत, ते असे-

१) चारित्र्य म्हणजे काय?
२) धैर्य म्हणजे काय?
३) न्याय म्हणजे काय?
४) श्रद्धा म्हणजे काय?
५) औचित्य म्हणजे काय?
६) ’चांगले’ कशाला म्हणावे?

मी हे पुस्तक वाचलेलं नाही. वाचायला आवडेल. पण हे प्रश्न वाचून मनात आलं की त्या काळात विचारल्या गेलेल्या या प्रश्नांची किती उत्तरं आजच्या काळापर्यंत मिळाली आहेत? हे प्रश्न आजच्या काळाशी सुसंगत आहेत का? या प्रश्नांना उत्तरे आहेत का? socrates ला हे प्रश्न का पडले असतील?! यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तसं पहावं तर व्यक्तिसापेक्ष बदलणारं आहे.

यातला पहिला प्रश्न वाचला आणि मला आपल्याला २.१ मधे दिलेल्या एका group discussion च्या विषयाची आठवण झाली. ”नदी ओलांडताना” असं त्या कथेचं नाव होतं. माया नावाची गरीब मुलगी आपल्या नदीपलिकडे राहणाऱ्या, आजारी असलेल्या प्रियकराला भेटायला जाऊ इच्छित आहे. त्यासाठी मायाला नाविकाला शय्यासोबत करावी लागणार असते. कारण तिला तिचे नातेवाईक पण मदत करत नाहीत. परंतु तिचा प्रियकर मात्र तिने आपले शरीर विकले हे ऐकून संतापतो व तिला हाकलून देतो. शेवट प्रश्न होता- ”तुमच्या मते यातील सर्वात वाईट व्यक्ती कोण?” यात प्रश्न उभा राहिला होता की ’चारित्र्य’ म्हणजे काय बरं? या एका प्रसंगातून आपण मायाला ”चारित्र्यहीन’’ ठरवणार का? तिनं जे केलं त्याला आपण ”धैर्य” म्हणू शकतो का? जेव्हा प्रश्न विचारला जातो की ”तुमच्या मते वाईट कोण?” तेव्हा नकळत आपल्याला ”चांगले” कोण हेही ठरवावं लागतंच की! बर तिनं जे काही केलं ते त्या परिस्थिती नुसार ”उचित” होतं का? तिच्या प्रियकारानं तिला घरातून हाकलून दिलं, हा तिच्या त्यागाला मिळालेला ”न्याय” होता का? तिनं प्रेमावर आणि प्रियकरावर जो विश्वास ठेवून हे धाडस केलं ती तिची त्यांच्यावर असणारी ”श्रद्धा” चुकीची होती का? कथा एकच- प्रश्न मात्र बरोब्बर ६... socrates चेच प्रश्न.... उत्तरं किती? नाहीच की असंख्य???

२.१ मधे दिलेली एक कथा. त्यावर झालेली घमासान चर्चा... चर्चेतून एक उत्तर निघेल आणि अमुक एक व्यक्ती ”वाईट” एकमतानं ठरेल अशी आशा ठेवणं, हा विनोद आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीवर, विचारांवर, संस्कारांवर,सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमीवर आणि संवेदनशीलतेवर यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. माणूस, काळ, परिस्थिती जशी बदलते तसं त्याचं उत्तरही बदलत जाणार असे हे प्रश्न. म्हणजे फ़क्त व्यक्तिसापेक्ष नव्हेत तर कालसापेक्षसुद्धा!! मी २.१ च्या वेळेला या कथेविषयी विचार करताना खूप गोंधळलेली होते. खरं तर अजूनही आहे. मला ”सर्वात वाईट कोण” ते अजूनही नीट ठरवता आलेलं नाही. म्हणजेच मला या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीत. आपल्या दैनंदिन व्यवहारामधे आपण याच प्रश्नांना भिडत असतो ना? प्रत्येक प्रश्नाच्या कित्येक छटा आहेत. माझ्यावर होणारा ”न्याय” हा दुसर्‍या कुणवर कधीतरी ”अन्याय” असू शकतो निदान त्या व्यक्तीला तसं वाटू शकतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातली सीमारेषा ठरवताना होणारे वाद आपल्याला माहीत आहेतच. आधुनिक युगामधे ’चारित्र्य’ ही संकल्पना झपाट्यानं बदलत आहे. चांगले कशाला म्हणावे; हा प्रश्न तर रोजच्या जेवणापासून सुरू होतो! भाजी मला ”चांगली” वाटेल.... कुणाला ”बेचव”...! नोकरी सोडून गावात जाऊन काम करणं कुणाला ’धैर्य’ वाटेल, कुणाला ’कर्तव्य’ वाटेल तर कुणाला ’मूर्खपणा’!!! किती साध्यासुध्या गोष्टीतून आपल्याला हे प्रश्न भेटत असतात. पण आपण त्यांची मांडणी socrates सारखी करत नाही.... :)

दररोजच्या व्यवहारात आपण या ६ चाकी प्रश्नांच्या गाडीवर बसलेले असतो. ideal system ती का ज्यात यातील एकही चाक puncture झालेलं नाही...? गाडी इतकी सुरळीत चालण्यासाठी काय बरं करायला हवं...???

’बदलते विश्व’ मनात खूप प्रश्न निर्माण करतं. ”बदला” प्रमाणे ते गतीमान आहेत आणि ”विश्वा”प्रमाणे खूप मोठे आणि अनाकलनीय.........विश्व-बदल झपाट्यानं होतोय... आपल्याला या ६ प्रश्नांची उत्तरं कधी सापडणार आहेत..?

- मुक्ता गुंडी.

Tuesday, June 9, 2009

काकू आणि कार्तिक

I visited Orphanage twice this week.

Saturday

When I went on Saturday, construction was going for the top room of orphanage.The roof is made of tin sheets, which becomes unbearably hot during summer and leaks during rainy season. So a new roof is being made. I told Kaku that we can help out with some part of the money.

Interesting Idea

Two software engineers were also present there. As they both did not knew Marathi, I had to be a translator between them and Kaku. They have written a book and had decided that the orphanage will get the royalty amount. The idea was interesting. It will also help in the sale of their book plus the orphanage will get contributions.

To take or not?

Kaku said that there was a one year old boy who needs help. I am thinking whether I should take him or not. She asked me,”What should I do? There is no space here and also cannot leave the boy”. I had no other option. I just gave a helpless smile.

Fresh Addition to orphanage

As I had promised Kaku that I will help out in construction. I went to orphanage after office yesterday. Kaku had adopted the baby boy. His name is Kartik and he is very cute. :).

Kaku said,"I had to accept him. What is his fault?"

Unimaginable Problems:-

Kaku said some people were asking for adoption from orphanage. But they were specifically demanding children of age 10-12. She said that later they came to know that there was no one to work for the old parents in the home. So they wanted children more for their house work rather than adoption. Just another form of ‘Child Labour’.

Kartik

Asking about story of Kartik we came to know that, Kartik’s mother is a 20 something girl who got married to a guy. Later she came to know that the guy already had some 10-12 wives. She went into depression and is extremely sick now. She is not in a position to take care of Kartik. I don’t know about the details of her disease and all. She has officially given Kartik to Kaku.

Notable point

In the last two visits only I saw 5 software engineers other than me visiting the orphanage. Good to see people (esp software people) getting connected to at least some problems around them.

Questions that arise in my mind

1. Kaku is hardly educated (6th pass). She doesnt read books or havent met people with great thinking in her life. Then how come she has such high level of thinking?

2. How can she so easily accept other people's faults and love them unconditionaly?

3. There are so many children there yet after so many visits, how come I never see anybody get irritated with children?

4. She is working hard and struggling for children. But she is getting so much of love in return.

She has a very nice purpose for her life. Isn't she also getting many things in return?

-Anwar

5th June 09

वाचले... so what??

निर्माण विशेषांकाची ओळख करून देणारा एक लेख लिहिण्याचं काम मी मध्यंतरी केलं. त्या निमित्तानी आपला विशेषांक अगदी नीट आणि त्यातल्या जाहिरातींसकट पुन्हा वाचला. हे काम करत असताना मला माझ्यातल्या काही त्रुटी खूप जाणवल्या. ते तुम्हाला सांगावसं वाटलं. २.२ च्या वेळी अंक हातात घेतला. चाळला.. मग त्यातले काही लेख नीट वाचले. काही राहून गेले. दत्ता काकांनी हा लेख लिहायची आयडीया देईपर्यंत मी ते राहिलेले लेख काही पुन्हा काढून वाचले नव्हते. विसरून गेले होते. किंवा त्याकडे दुर्लक्ष केलं, असं पण म्हणू शकतो आपण... लेख लिहायला घेतला आणि पवन च्या चित्रापासूनच अडायला सुरुवात झाली! त्याला फोनवर चित्राचा अर्थ विचारला आणि अंकातला इन्टरेस्ट वाढला. २.२ मधे त्यानी त्या चित्रा विषयी सांगितलं होतं खरं पण लिहायला लागल्यावर मला काही सुचेना! अंक वाचताना मला मी तो जणू काही पहिल्यांदाच वाचत आहे असं वाटलं! अंक तोच होता, मी पण तीच होते पण माझी भूमिका बदलली होती. आधी मी एक त्रयस्थ वाचक होते पण आता मात्र त्या अंकाविषयी इतरांना काही सांगू पाहणारी त्याच अंकाची आणि गटाची सभासद. आता मोघम वाचून चालणार नव्हतं ना!
लेखानिमित्त श्वेता आणि चारुताशी बोलले. त्याना हा अंक काढताना कसं सगळ्यांना ’पुश’ करावं लागलं आहे याचा अंदाज आला. मनुष्यबळ कसं कमी होतं. हा अंक निर्माणचं मुखपत्र होऊ नये यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचा अंदाज आला. लेख निवडण्यामागे त्यांची काय भूमिका होती हे समजलं. या सगळ्या गोष्टींपासून मी आधी किती आलिप्त होते!कुठलेही पुस्तक वाचताना मी अशी आलिप्तच असते का? वाचन करताना पुस्तकात व्यक्त केलेल्या भावनांचा, भूमिकांचा, माहितीचा मी एक ’छापील मजकूर’ म्हणून विचार करते की त्यापलीकडेही ती पुस्तकं मला ”त्रास” देतात? हो! त्रास देतात का मला पुस्तकं? पुस्तक संपल्यावर मला किती वेळ अस्वस्थ व्हायला होतं? झालेच अस्वस्थ तर मी ते बाजूला सारून पुढे जाते की त्याची नीट शहानिशा करते? अस्वस्थ हा शब्द नकारार्थी नाही हं. एखादं आनंददायी पुस्तक मला किती काळासाठी आनंद देतं? माझ्या असं लक्षात आलं आहे की मी कित्येक वेळा पुस्तक वाचताना ’passive' असते. मी वाचते- अस्वस्थ होते- सोडून देते. ही प्रोसेस अतिशय धोकादायक आहे, नाही का? अस्वस्थतेचं काहीच प्रोसेसिंग होणार नसेल तर पुस्तक वाचून मी वेळ वाया घालवत आहे. असं दर वेळेला होत नसलं तरी हे पूर्णपणे टाळायला मला आवडेल. विचार करण्याचा actively प्रयत्न करायला लागतो. त्यातून analyse करून काही एका निर्णयाप्रत यावं लागतं, निर्णय नाही तरी निदान एक प्रोसेस सुरू व्हावी लागते. मी याचा कंटाळा करते असं मला वाटलं.. पुस्तक वाचून त्यविषयी मी कुणाला तरी काही सांगू शकले तर मलाच ते पुस्तक जास्त चांगलं समजेल. आणि ही प्रोसेस सुरू होईल, मझीच नाही, त्या ऐकणार्‍या व्यक्तीची पण!

निर्माणच्या पुढच्या अंकासाठी मी नक्की मदत करीन. वाचन जास्त अर्थपूर्ण करता यावं यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. हे मला हा लेख लिहिताना समजलं.

-मुक्ता गुंडी