Monday, October 12, 2009

लोकशाही च्या प्रयोगातील निर्णायक वळण: एका अज्ञानी युवकाच्या दृष्टीतून

ADR (Association for Democratic Reforms) व NEW (National Election Watch) यांनी केलेले काम हे  लोकशाही बळकट करण्यासाठीचा फार महत्त्वाचा टप्पा वाटतो. महाराष्ट्रात 13 ऑक्टोबर 2009 रोजी निवडणूक होणार आहे. NEW नी 169 उमेदवार, जे 2004 साली उभे होते व आता 2009 मध्ये परत उभे रहाणार आहेत अशा उमेदवारांची माहिती संकलित केलेली. याची PDF आपल्याला इथे मिळेल.
या 169 उमेदवारांच्या माहितीचा थोडा अर्थ लावण्याचा प्रयत्न

सरासरी मालमत्ता
 • 2004 साली 1.3 कोटी होती 
 • 2009 साली 3.8 कोटी आहे 
 • म्हणजेच सरासरी 2.5 कोटी ची वाढ 
एकूण मालमत्ता 
169 उमेदवारांची मिळून एकूण मालमत्ता 
 • 2004 साली 229 कोटी 
 • 2009 साली 657 कोटी 
 • म्हणजेच 428 कोटी ची वाढ
पक्ष निहाय उमेदवारांची मालमत्ता
 • काँग्रेस    39 उमेदवार:    एकूण 291 कोटी:   सरासरी 5.8 कोटी
 • राष्ट्रवादी  39 उमेदवार:    एकूण 139 कोटी:   सरासरी 3.5 कोटी
 • शिवसेना 33 उमेदवार:    एकूण 131 कोटी:   सरासरी 3.8 कोटी
 • बीजेपी     23 उमेदवार:   एकूण 48   कोटी:   सरासरी 2 कोटी
Top 10 अमीर उमेदवार

तक्त्यावर क्लिक करा!!

विचार, विश्लेषण 
आपले राजकीय पुढारी हे पैसेवाले आहेत हे तर यावरून सिद्ध होते. पण पैसे असणे हा काही गुन्हा नाही. हे पैसे नेमके कसे मिळवले जातात हे समजले पाहिजे. ते कसे समजेल?

एका थियरी नुसार बदल घडण्यासाठी च्या चार पायर्‍या असतात. विवेक सावंतांकडून मी या शिकलो. त्या चार पायर्‍या आहेत
 • Information: परीस्थिती काय आहे, नेमका प्रश्न काय आहे या बद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचणे ही पहिली पायरी. जसे की ग्लोबल वॉर्मिंग बद्दल 'Inconvenient Truth' या चित्रपटाद्वारे शास्त्रशुद्ध माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचली. अनेक नेते पैसे खातात हे जरी सर्वज्ञात असले तरी याची नेमकी अकडेवारी आता आपल्या समोर आहे. चला तेवढे नीट समजले.
 • Interaction: एकदा महिती पोहोचली की लोक त्यावर विचार करतात, चर्चा करतात वाद घालतात... या बद्दल काही करता येईल का याबद्दलचे मार्ग शोधायचा प्रयत्न करतात. आजकाल ब्लॉग्स लिहितात :) ही झाली दुसरी पायरी. 
 • Transaction:  त्यापैकी काही लोक या बद्दल कृती करायला लागतात. वैयक्तिक, एकत्र येवून, अनेको प्रकारच्या ज्याला जमेल तशा.
 • Transformation: या तिन्ही पातळ्यांवर अनेको लोक आपापल्या परीने योगदान देत असता... कधीतरी अशी एक अवस्था निर्माण होते की बधल घडून येतो. 
राजकारणी आणि नोकरशाहीतील भ्रष्टाचारी वृती यावर नियंत्रण आणण्याच्या लढ्यात माझ्या मते आपण पहिल्या पायरीवर आहोत. व्यापक प्रमाणात लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे हे इंटरनेट, मोबाईल या माध्यमातून शक्य झाले आहे. यांचा उत्तमोत्तम वापर करून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे चालूच ठेवावे लागेल. इंटरनेट सध्या काही मर्यादित वर्गापर्यंत पोहोचले आहे. पण हा वर्ग म्हणजे माझ्या तुमच्या सारख्यांचा वर्ग. जो राजकीय बाबतीत सर्वात कमी जागृत असायचा. त्यामुळे आता राजकीय वास्तव एक वेगळेच वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दुसर्‍या आणि तिसर्‍या पायर्‍यांवर आपण कसे काम करायचे हे आता आपल्या समोरील आव्हान राहील.

भारतातील अवाढव्या अशा लोकशाही च्या LIVE प्रयोगात काय काय घडते त्याबद्दल उत्सुक!!

-प्रियदर्शन

1 comment:

THANTHANPAL said...

लोकशाही म्हणजे जनतेचे , जनतेकरता , जनतेने निवडलेले सरकार.हि अब्राहीम लिंकन यांनी केलेली व्याख्या . पण भारतात जनतेने निवडून दिलेले सरकार, नेत्याच्या भ्रष्ट्राचारा करता, भ्रष्ट्र नेत्या कडून चालवले जाणारे सरकार म्हणजे लोकशाही अशी झालेली आहे. जो पर्यंत मताची खरेदी विक्री , धर्म , जातीपातीचे राजकारण कायद्याने बंद होत नाही तो पर्यंत हकीम लुकमान कडेही यावर ओषध मिळणार नाही, आणि या करता खुले जनमत घेण्या करता सरकारवर जनमताचा प्रचंड दबाब आणणे आवशक आहे.