Friday, October 9, 2009

ADR, NEW व राजकारणाचे बिसनेस मॉडेल

पी साईनाथ यांच्या लेखावरून प्रेरीत . इथे वाचू शकतो.
नवीन उद्योग सुरू करताना आपण अर्थातच नफ्याचा विचार करतो. जगातील जटिल प्रश्न सोडवण्यासाठी अनेक उद्योजक नवनवीन प्रयोग करून वेगवेगळी बिसनेस मॉडेल्स विकसित करत आहेत. पी साईनाथ यांच्या लेखामुळे व NEW, (National Election Watch) या नवीन चळवळीच्या कामातून हे अफलातून, अविश्वसनीय वाटावे असे बिसनेस मॉडेल समोर आले आहे. (हे माहित नव्हते असे नाही पण नेमकी आकडेवारी मिळाल्यामुळे हे नीटच समजले आहे)
ADR व NEW
या निमित्तानी नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम समजले. ADR (Association of Democratic Reforms)  यांनी केलेल्या PIL मुळे 2002 साली उच्च न्यायालयानी असा निर्णय दिला की निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराने आपले शिक्षण, मलमत्ता व criminal record जाहीर केले पाहिजे. या PIL च्या प्रकियेचा इतिहास इथे वाचा. NEW ही 1200 चे संघटन आहे व ते उमेदवारांनी जाहिर केलेली माहिती संकलित करून लोकांसमोर मांडतात.
काही आकडेवारी: एक यशस्वी बिसनेस मॉडेल
हरियाणा मध्ये 42 MLA जे पुन्हा उभे आहेत त्यांबद्दल काही माहिती
  • सरासरी त्यांची मलमत्ता 4.8 कोटी रुपयांनी वाढली आहे
  • सरासरी 388% मालमत्तेत वाढ
  • म्हणजेच प्रत्येकाची सरासरी दर महा वाढ 8 लाख रुपये 
  • म्हणजेच अंदाजे 1,100 रु
  • प्रति तास 
  • वाढीचा सर्वोत्कृष्ट दर असलेले पहिले 4 MLA यांच्या मालमत्तेत 800% वाढ आहे 
  • यातील अग्रक्रमांकावर असलेला MLA ज्याची मालमत्ता 1 लाख होती त्यात 5000% वाढ असून ती आता 50 लाख रुपये झालेली आहे
हा वाढीचा दर लक्षात घेता साईनाथ म्हणतात की प्रत्येक भारतीय नागरीकाने किमान एकदा तरी MLA बनावे! गरिबी हटवण्यासाठी चे हे सर्वोत्तम बिसनेस मॉडेल राहील. NREGA चे वाढीव 100 रु किमान वेतन जरी धरले, तरी 8000 दिवस (20 वर्षे) राबून झालेली कमाई महिन्यात होऊन जाईल.


myneta.info माहितीची क्रांती
आपल्या मतदार संघातील उमेदवाराची माहिती हवी असल्यास myneta.info वर मिळेल. बहुतांशी उमेदवारांची माहिती इथे उपलब्ध आहे. बघा... व जागृत व्हा... मी झालो तसा :)
पुढील आव्हाने
ADR नी केलेल्या कामातून प्रचंड फारच प्रेरणा मिळाली. केवळ PIL करून ते थांबले नाहीत. NEW या उपक्रमातून त्यांनी या माहितीचे उचित स्वरूपात संकलन करण्याची जबाबदारीही हाती घेतली आहे. लोकशाही ला बळकट करण्यासाठी ही दोनही केवढी महत्त्वाची कार्य!  प्रत्येक सामान्य माणसापर्यंत ही केवढी मोठी माहितीची ताकत या कार्यामुळे आली आहे.  आता पुढे काय? सध्यातरी मी माझ्या मित्रपरीवारामध्य या महितीचा प्रचार करतो आहे.
आजून काही बाळबोध प्रश्न पडतात.
  • 1 लाख रुपयापासून 50 लाख रुपयापर्यंत जाणार्‍या माणासाचे काय होते? 
  •  नेमके या मागचे गूढ काय असते? 
  • गोविंदा निवडून आल्यावरही चित्रपटात कामे कसे काय करतो? 
  • मी काय करू शकतो?
तुम्हालाही काही सुचत असेल, प्रश्न असतील तर शेअर करा ...

तरीही प्रचंड आशावादी मनस्थितीत...
-प्रियदर्शन

No comments: